नाशिक: गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी भोंदू अशोक खरातला पोलीस कोठडी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी-Bhondu Ashok Kharat Maharaj Live News
नाशिक: बहुचर्चित भोंदू अशोक खरात यास एसआयटीने तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे .सात महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे .व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य न्याय दंडाधिकारी(CJM) बी .एन ईचपुराणी यांच्या कोर्टात ही सुनावणी पार पडली.
खरात विरोधात दाखल तिसऱ्या गुन्ह्यातील फिर्यादीनेच खरात महिलांवर लैंगिक अत्याचार (Sexully Assult)करत असल्याबाबत पर्दाफाश केला आहे फिर्यादी खरातकडे ऑफिस बाय म्हणून कामाला होता .त्या कालावधीत त्याचा विवाह झाला त्याची पत्नी गर्भवती असताना संशयीत खरात ने प्रसुती सुखरूप होण्यासाठी त्याला पत्नी सोबत घेऊन येण्यास सांगितले .फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास असल्याने तो त्याच्या पत्नीला घेऊन आला परंतु पूजा विधीच्या नावाखाली भोंदू खरात (Ashok Kharat)यांनी सात महिन्याच्या गर्भवतीवर अत्याचाराचा प्रयत्न केला घरी आल्यानंतर तिने झाला प्रकार सांगितल्यानंतर फिर्यादीने अत्याचाराचा भांडाफोड केला याप्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .तिसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीने घेतला आहे दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी (MCR)सुनावण्यात आल्याने त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती .तिसऱ्या गुन्हा प्रकरणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.
एसआयटीचे म्हणणे (SIT)
एसआयटी अधिकारी अमोल भारती म्हणाले की तक्रारदाराच्या सात महिन्याच्या गरोदर पत्नीवर खरात अत्याचार केला गरोदर महिलेला अधिक काळजी घ्यावी लागते अशी सांगत सुखरूप बाळंतपणासह मुलगा होण्याचा दावा करत त्याने पूजा करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ईशानेश्वर मंदिरात पूजाविधी आणि अघोरी कृत्य केल्याचा प्रकार भारती यांनी निदर्शनात आणला खरात ने पूजा विधीसाठी कापडी वाघ, नकली साप कुठून आणले? तसेच नकली हिरे चिंचोके याबाबत तपास करायचा आहे असे त्यांनी सांगितले.
वकिलांचे युक्तिवाद(Agrument)
पूजा विधीच्या बहाण्याने सात महिन्यांच्या गर्भवतीवर अत्याचार झाला प्रत्येक गुन्ह्यात पीडित महिलाही वेगवेगळ्या आहेत गुन्ह्याची व्याप्ती बघता सर्वच गुन्ह्याचा सखोल तपासणी गरजेचे असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी केली .तर आधीच्या पोलीस कोठडीत(PCR) मागणीतील हेच मुद्दे मांडण्यात आले होते रिमांड रिपोर्ट मध्ये खरात गुन्हा कबूल केल्याचे नमूद आहे दुसरीकडे तो तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे असा युक्तिवाद खरातच्या वकिलांनी केला.

0 Comments