सतांपजनक : जंगलात नेऊन महिलेवर लैंगिक अत्याचार; बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-Dharashiv Crime News Live
धाराशिव : बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणाने जंगल परिसरात एका महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या प्रथम खबरीवरून दि. 14 एप्रिल 2026 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणांनी दि. 06 एप्रिल 2026 रोजी संबंधित आरोपी तरुणाने जंगलात नेऊन पिडीतेवर जबरदस्तीने अत्याचार केला. घटनेनंतर काही दिवसांनी पिडीतेने धाडस दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) अंतर्गत कलम 64(1) आणि 79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच पिडीतेला आवश्यक वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवा न पसरविण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

0 Comments