चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील नेताजी अशोक शिंदे यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तुळजापूर तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने दि,२२ रोजी सत्कार करण्यात आला. शिंदे हे सुरुवातीपासून सामाजिक प्रश्नांचे जाण असणारे, अन्याय अत्याचाराच्या विरोधात सतत प्रयत्नशील असतात या सर्वांगीण कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . या सत्कार प्रसंगी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुकाध्यक्ष गणेश पाटील, शहर प्रमुख निखिल अमृतराव, सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, विकास सोसायटी चेअरमन बालाजी शिंदे, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, शहाजी येवते, मारुती शिंदे, मोहन इंगळे, भीमाशंकर भुजबळ, दत्तात्रय पाटील, नेताजी येवते , मोतीराम चिमणे, रामकृष्ण मुळे, रत्नाकर चिमणे ,वासुदेव हिंगमिरे, प्रकाश राजमाने, राजेंद्र बिराजदार,आदीसह ग्रामस्थ उपस्थित होत.
0 Comments