चिवरी /बालाघाट न्युज टाइम्स: पैसा म्हटलं की भल्या भल्यांची मती काम करत नाही., मात्र काहीजण पैशाच्या मोहापेक्षा प्रामाणिकतेला प्राधान्य देतात, असाच प्रामाणिकपणा तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील बबुराव नागनाथ शिंदे यांने दाखवला अन् रस्त्यामध्ये सापडलेली ४२ हजाराची पिशवी संबंधितांना स्वतः संपर्क साधून परत केली. सविस्तर वृत्त असे की चिवरी येथील युवक बबुराव नागनाथ शिंदे यांना अणदुर - चिवरी प्रवास करीत असताना चिवरीपाटी चौकात एक बँक पासबुक व ४२ हजार रुपये रोख रक्कम असलेली पिशवी सापडली . त्यांनी बँक पासबुकच्या नावावरून अणदूर येथील शेतकरी अशोक कांबळे यांच्याकडे रक्कम सुपूर्द केली . श्री .शिंदे यांनी केलेल्या प्रामाणिकपणाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे. शिंदे यांच्या प्रामाणिकतेबद्दल येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीकडुन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि,६ रोजी सत्कार करण्यात आला. यावेळी विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे सह, सर्व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होत.
0 Comments