तुळजापुर: नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा नूतन वर्षाच्या ५ ते ६ जानेवारी या कालावधीत निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. उपसरपंच पदाच्या निवडणुकीसोबतच ग्रामपंचायतीची पहिली सभाही त्याच दिवशी घेण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी यांनी संबंधित तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. उपसरपंचाच्या निवडीनंतर नव्या वर्षाच्या आरंभापासून ग्रामपंचायतच्या कारभाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्यासह गावोगावी ग्रामस्थांचा उत्सासही शिगेला पोहोचला आहेत. त्यामुळे तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतमध्ये राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून सरपंचाच्या निवडणुकीनंतर आता होणाऱ्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीकडे इच्छुकांचा डोळा असुन, नवीन वर्षात ५ ते ६ जानेवारी २०२३ रोजी ह्या निवडणुका होणार आहेत.
0 Comments