Hot Posts

6/recent/ticker-posts

यंदा जिल्ह्यामध्ये गहू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल


उस्मानाबाद: जिल्ह्यात यावर्षी सुरुवातीपासूनच पाऊस झाल्याने परिसरात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, त्यामुळे  यावर्षी ज्वारी, हरभरा पाठोपाठ गहू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे. यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी, विविध कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे खरिपातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या संकटातून  कशीबसे सावरून रब्बी पेरणी करत आहेत , सध्या रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आले असून यात ज्वारी व हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक दिसून येत आहे त्यापाठोपाठ  परिसरात थंडीचे प्रमाण वाढल्याने गहू पेरणीकडेही शेतकऱ्यांचा ओढा दिसून येत आहे.


Post a Comment

0 Comments