Hot Posts

6/recent/ticker-posts

तालुक्यात सरपंच पदासाठी अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग आता कोण माघार घेणार ? कोण ठेवणार ? याकडे गाव पुढाऱ्यांचे लक्ष


तुळजापूर: तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज छाननी प्रक्रिया आज दि,५रोजी पार पडली त्यामुळे आता दि ,७ रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून केली जात असल्याने सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीत  चुरस वाढली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये तरुणाने देखील यामध्ये उडी घेतलेली दिसून येत आहेत. तर सरपंच पदाचे अनेकांना डोहाळे बांधलेले आहेत तसेच पॅनल मधील अनेक उमेदवारांचा उपसरपंच पदावरही डोळा असल्याचे चित्र दिसत आहे. तर काहीजण निकाल लागण्यापूर्वीच 'मीच सरपंच होणार 'असे मिरवत आहेत. त्यामुळे सरपंच पदासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसत आहे. 

तालुक्यातील मोठ्या गावात सरपंच व सदस्य पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे दिसत आहे, यामध्ये काटगाव , आपसिंगा , सावरगाव ,काटी , काक्रंबा या गावात अटीतटीच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे, त्याचबरोबर इतर गावांमध्ये देखील तिरंगी व चुरशीच्या लढती होत आहेत. एकंदरीत गावागावांमध्ये  गाव गाड्यांच्या राजकारणाचे डावपेच रंगत आहेत, यंदा निवडणुकीचा ज्वर जरा वेगळा दिसत आहे. त्यामुळे आता आपला उमेदवार निवडून येण्यासाठी गाव पुढारी कामाला लागली आहेत. कोण होणार गावचा नवा कारभारी?कोणता उमेदवार एक पाऊल पुढे राहणार याबाबत  तर्कवितर्क लावली जात आहेत. तसेच गावामध्ये कोणता उमेदवार प्रबळ आणि कोणता उमेदवार दुबळा यावर चकमकीच्या फैरीही जडत आहेत. त्यामुळे उमेदवार एक एक मतदान आपल्याकडे कसे वळवावे यासाठी खलबत्ते सुरू झाली आहेत. जुने हेवे दिवे, द्वेष ,मैत्री, मदतीची आठवणी ,स्थानिक राजकारण, जातीय समीकरणे, पक्षाचे व गटाचे आमिषे दाखवीत निवडणुकीचा गाववाड्यातील महायज्ञ अर्ज छाननीनंतर पेटला असल्याचे चित्र दिसत आहे.


Post a Comment

0 Comments