Hot Posts

6/recent/ticker-posts

तरुणांमध्ये व्हिजन निर्माण करणे आवश्यक - विश्वनाथ तोडकर |It is necessary to create vision among the youth - Vishwanath Todkar

 तरुणांमध्ये व्हिजन निर्माण करणे आवश्यक - विश्वनाथ तोडकर |It is necessary to create vision among the youth - Vishwanath Todkar



कळंब (प्रतिनिधी) - सध्याची तरूण पिढी राजकिय पक्षांच्या मागे निव्वळ फिरण्यामुळे व धाबा संस्कृती वाढल्यामुळे भरकटत चालली आहे त्यामुळे सध्याच्या शिक्षकांनी तरूणांमध्ये व्हिजन निर्माण करून तरूणांच्या आयुष्यात दिशा देणे आवश्यक असल्याचे मत पर्याय सामाजिक संस्थेचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ तोडकर यांनी व्यक्त केले.

ते तालुक्यातील हसेगाव (के) येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ संलग्नित कळंब तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ सी व्ही रमण आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार मुख्याध्यापक दत्तात्रय टेकाळे यांना  वितरणा प्रसंगी  बोलत होते. 


यावेळी व्यासपीठावर ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक डॉ ज्ञानोबा जाधव, मंडळाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र स्वामी, पत्रकार बालाजी आडसुळ, मुख्याध्यापक बलभीम बोंदर  जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोरोबा सातपुते  आदी उपस्थित होते. 


सुरवातीला भारतरत्न डॉ सी व्ही रमण व पद्मश्री शंकरबापू यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रजवलन करण्यात आले. 



पुढे बोलताना तोडकर म्हणाले की शिक्षक च देशाचे भवितव्य ठरवत असतात पण सध्या सर्वात जास्त आणि सर्वच क्षेत्रातील कामाचा बोजा शिक्षकांवर टाकला जातो आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. ही परिस्थिती जाणणारा व योग्य दिशा देणारा नेताच आता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ जाधव, पत्रकार आडसुळ, पुरस्काराथी दत्तात्रय टेकाळे, विनोद सागर यांनी आपले विचार मांडले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांनी केले तर सुत्रसंचालन रामकिशन गायकवाड यांनी केले आभार शंकर गोंदकर यांनी मानले. यावेळी तालुक्यातील विज्ञान शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे तालुकाध्यक्ष शेळके राम, आनंद गायकवाड, परमेश्वर शिंदे, कोल्हे दत्ता, आदित्य हजारे, बाबासाहेब दराडे, कोरे संतोष, कुंभार भाग्यश्री आदिनी प्रयत्न केले. 


▶️

तोडकर यांनी दिले शाळेसाठी एक लाख रुपये 


तोडकर हे राज्यातील विविध क्षेत्रातील गरजुना मदत करण्यासाठी पुढे असतात त्यांनी राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. आज त्यांच्याच गावच्या पद्मश्री शंकरबापू विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेसाठी विश्वनाथ तोडकर यांनी एक लाख रुपयांची देणगी शाळेसाठी दिली. म्हणून शाळेच्या वतीने सचिव किरण पाटील, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने ऋणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 


▶️

पद्मश्री शंकरबापू विद्यालयातील इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संध्या बंडू गालफाडे ही शाळेतून प्रथम आल्याबद्दल तिला राज्य शासनाकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त झालेला पाच हजार रुपयांचा चेक ही सर्व मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

संध्या बंडू गालफाडे या विद्यार्थिनीस शाळेतून प्रथम आल्याबद्दल राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या शिष्यवृत्तीचा अंतर्गत धनादेश मान्यवरांच्या सुपूर्द करण्यात आला.

Post a Comment

0 Comments