तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालयाचा दिंडी सोहळा उत्साहात

चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे आषाढी एकादशीनिमित्त येथील दत्तू पाटील अण्णा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाल दिंडी सोहळा दि,१ रोजी उत्साहात साजरा केला. यावेळी विद्यालयातील बालवारकऱ्यांनी विविध वेशभूषा सादर करत गावातील ज्येष्ठ वारकरी मंडळींसोबत संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात दिंडी करण्यात आली,तसेच विविध प्रात्यक्षिक सादर केले. यामध्ये रिंगण सोहळा, फुगडी ,अभंग, टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांसाठी इंदिरानगर मित्र परिवाराकडून अल्पोहाराची व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती .या सोहळ्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एल.के. बिराजदार, शिंदे एस.एम, सुर्यवंशी के.एस, शिंदे एस.बी,ठाकूर के.पी,ढगे मॅडम, आदींसह कर्मचारी ,गावातील जेष्ठ वारकरी मंडळी यांनी सोहळा यशस्वीसाठी परिश्रम घेतले.
0 Comments