जि.प.मा.उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लेडीज क्लबच्या वतीने 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचे मोफत प्रदर्शन
धाराशिव : प्रसिद्ध दिग्दर्शक श्री.केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला 'बाईपण भारी देवा' हा मराठी चित्रपट महिला-भगिनींच्या पसंतीस उतरत आहे. आपल्या भागातील महिलांना देखील तो चित्रपट पाहता यावा, त्यांना आपल्या स्वतःसाठी वेळ काढता यावा या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर तालुक्यातील महिलांसाठी जवाहर टॉकीज, तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातील महिलांसाठी ताजमहल टॉकीज, धाराशिव येथे मोफत शोचे आयोजन करण्यात आले आहे.
लेडीज क्लबच्या वतीने वर्षभर महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सदरील चित्रपटाने महिलांचे जीवन आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळेच त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र अनेक महिलांची इच्छा असून देखील त्यांना चित्रपट पाहण्याची संधी मिळत नाही.
या अनुषंगाने अशा महिलांसाठी दिनांक २९ व ३० जुलै २०२३ रोजी दुपारी १२:०० ते ०३:००, ०३:०० ते ०६:०० आणि सायंकाळी ०६:०० ते ०९:०० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. तरी तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे लेडीज क्लबचा वतीने आवाहन करण्यात येत आहे.
0 Comments