Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील पाटील विद्यालय मध्ये यूपीएससी उत्तीर्ण शशिकांत विभुते यांचा सत्कार

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील पाटील विद्यालय मध्ये यूपीएससी उत्तीर्ण शशिकांत विभुते यांचा सत्कार
चिवरी :तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील दत्तू अण्णा पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये दि,२४ रोजी बोरामणी येथील युवक शशिकांत सोमनाथ विभुते यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये आयएएस पदावर यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला, तसेच यावेळी श्री विभुते यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एल .के .बिराजदार, माजी प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील, सरपंच प्रशांत ( पिंटू) बिराजदार, उपसरपंच लक्ष्मण लबडे, प्रभाकर बिराजदार, चंद्रकांत झिंगरे, विवेकानंद पाटील, प्रकाश बिराजदार , माजी सैनिक विठ्ठल होगाडे,ग्रापं स. दीपक पाटील , प्रकाश राजमाने , आदीसह सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, महिला, तरुण ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments