Hot Posts

6/recent/ticker-posts

शालेय पोषण आहार मधील कार्यकर्त्याच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची मागणी , आंदोलनाचा इशारा

शालेय पोषण आहार मधील कार्यकर्त्याच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची मागणी , आंदोलनाचा इशारा 

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

उस्मानाबाद : शालेय पोषण आहारमधील कार्यकर्त्याच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची मागणी शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. ७ आगस्ट २०२३ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे , उस्मानाबाद जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने आपणास नम्र निवेदन देण्यात येते की, आमच्या मागण्या खालील प्रमाणे- शालेय पोषण आहार कामगारांना दहा महिन्याच्या ऐवजी १२ महिने मानधन देण्यात यावे, हरियाना, तामिळनाडू येथे शालेय पोषण कामगारांना प्रति महिना १८०००/- मानधन आहे. त्या प्रमाणे मानधन देण्यात यावे, शालेय पोषण आहार कामगारांना शिपाई दर्जा देण्यात यावा, शालेय पोषण आहार कामगारांना पोषण आहार बनविण्याच्यतिरीक्त इतरीत काही कामे सांगु नये, शालेय पोषण आहार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करुन घ्यावे, शालेय पोषण आहार कामगारांना विनाकारण कामावरुन कमी करण्यात येवु नये. जर त्याच्याकडून चुक झाली असेल तर त्याची चौकशी करुन नंतरच त्याला कामावरुन कमी करावे. सदरील मागण्या मंजुर नाही झाल्यास आम्ही दिनांक दि. ७ आगस्ट २०२३ रोजी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष कुसम देशमुख यांची स्वाक्षऱ्यी आहे.


Post a Comment

0 Comments