विद्युत संबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी समिती स्थापन दर १५ दिवसाला विद्युत अदालतीचे आयोजन करुन तक्रारींचा निपटारा करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे निर्देश
उस्मानाबाद,दि.२१: विद्युत विभागाशी संबंधित तक्रारीचा निपटारा करताना सुसुत्रता आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. दर 15 दिवसाला विद्युत अदालतीचे आयोजन करुन तक्रारींचा निपटारा या समिती मार्फत करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
या समितीचे अध्यक्ष म्हणून महसूलचे उपविभागीय अधिकारी तर सदस्य सचिव संबंधित तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आहेत. तसेच संबंधित तालुक्याचे तहसीलदार आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी देखभाल दुरुस्तीसाठी व नवीन कामासाठी नेमलेल्या संस्था (कंत्राटदार) हे या समितीचे सदस्य आहेत.
0 Comments