कांदा निर्यात शुल्क मध्ये करण्यात आलेल्या ४०% वाढीचा निषेध बाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुळजापुर तालुका यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन
तुळजापुर : कांदा निर्यात शुल्क मध्ये करण्यात आलेल्या ४०% वाढीचा निषेध बाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, केंद्र सरकार ने कांदा निर्यात शुल्क मध्ये ४०% एवढी भयानक वाढ केली असल्याने यामध्ये कांदा दरावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. ही दरवाढ शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी ही घातक आहे. तरी ही दरवाढ मागे घेण्यासाठी तुळजापूर शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
हा निषेध लोकशाही पद्धतीने व्यक्त करण्यात येणार असून जर सरकारचे हे शेतकरी विरोधी धोरण असेच सुरु राहिले तर यापुढील आंदोलने ही तीव्र स्वरूपाची राहतील याची नोंद घ्यावी.या निवेदनावर जगन्नाथ मनोहर गवळी भोसले तालुकाप्रमुख शिवसेना (UBT) तुळजापूर तालुका यांची स्वाक्षरी आहे.
दिनांक- २३/०८/२०२३. वार- बुधवार, वेळ सकाळी ११:३० ते दुपारी ०१ दरम्यान स्थळ जुने एस. टी. स्टॅन्ड समोर, लातूर रोड, तुळजापूर. जि. धाराशिव.
.
0 Comments