धाराशिव :श्रीपतराव भोसले ज्यु. कॉलेजमध्ये चांद्रयान ३ मोहिम मार्गदर्शनपर कार्यक्रम
धाराशिव : येथील श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमध्ये दिनांक २२ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ मोहिमेवर आधारीत एका मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, या पूर्वसंध्येला महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने हे लँडिंग कसे असेल या संदर्भात काही चित्रफिती दाखवण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर लाभले. श्री. एल. व्ही. पवार सर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक श्री. टी. पी. हाजगुडे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद कला व वाणिज्य विभागाचे पर्यवेक्षक श्री. एन. आर. ननवरे सर यांनी भूषविले. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील भूगोल विषयाचे अध्यापन करणारे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पृथ्वी गोल पूजनाने झाली.
यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील प्रा. पी. टी. गवारे सर, प्रा. एम. पी. काळे सर, प्रा. कोरके के. के. सर, प्रा. गोरे सर, प्रा. मोहिते सर, प्रा.पाटील सर, प्रा. भोसले सर, प्रा. लोमटे ए. ए. सर, प्रा. खुने सर, प्रा. शिंदे सर, प्रा. बी. एस. नन्नवरे सर, प्रा. सौ. जाधव मॅडम, प्रा. सौ. वाडकर मॅडम, प्रा. सौ. शेळके मॅडम आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये दाखविण्यात आलेल्या सर्व चित्रफितींचे संकलन संगणक विभागाचे प्रमुख श्री. व्ही. बी. स्वामी सर यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. श्री. घोडके सर यांनी केले तर आभार श्री. पाटील सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री.एस. एस. देशमुख सर, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील सर व संस्था अध्यक्ष मा. सुधीर आण्णा पाटील सर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले.
0 Comments