Hot Posts

6/recent/ticker-posts

जनावरांची निर्दयीपणे वाहतुक करणाऱ्या दोघांवर गुन्हा ,तुळजापुर पोलीस ठाण्याचे कारवाई

जनावरांची निर्दयीपणे वाहतुक करणाऱ्या  दोघांवर गुन्हा ,तुळजापुर पोलीस ठाण्याचे कारवाई

प्रतिनिधि रूपेश डोलारे धाराशिव 


तुळजापुर : तालुक्यातील बारूळ पाटी नजीक पिकअप वाहनातून जनावराची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात बुधवारी दि,१७ रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की बालाजी बब्रुवान हावळे,वय 38 वर्षे, रा हंगरगा तुळ, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद, कलीम सत्तार कुरेशी, वय 38 वर्षे, रा. कुरेशी गल्ली, नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद  यांनी  दि.16  रोजी 13.30 वा.सु. बारुळ पाटीजवळ पिकअप क्र एमएच 25 पी 3718 मध्ये एक छोटी कारवड, एक खिलारा खोंड, एक रेडा सह पिकअप वाहन असा एकुण 2,20,000 ₹ किंमतीची जनावरे सह पिकअप मध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावराची निर्दयतेने बांधून घेवून वाहतुक करत असतांना तुळजापूर पो. ठाणे च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यांचा छळ कायदा कलम 11 (1) (के) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5,5(अ), 5(ब) सह मो.वा.का. 83, 177  अन्वये  तुळजापूर पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments