Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजाभवानी मंदिर मध्ये बीव्हीजी सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र केले परत|Tuḷajābhavānī mandira madhyē bīvhījī surakṣārakṣakācā prāmāṇikapaṇā dīḍa tōḷyācē sōn'yācē maṅgaḷasūtra kēlē parata

तुळजाभवानी मंदिर मध्ये बीव्हीजी सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूञ केले परत

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

तुळजापुर : तुळजाभवानी मंदिर मध्ये बीव्हीजी सुरक्षारक्षकाचा प्रामाणिकपणा दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पहिल्या मजल्याच्या लिफ्ट गेट जवळ गेल्या अवस्थेमध्ये सापडले होते .सदर सुरक्षारक्षकाने सापडलेले मंगळसूत्र  दर्शन मंडप कंट्रोल रूम मध्ये कोणताही स्वार्थ न दाखवता जमा केले,दिनाक 21 ऑगस्ट रोजी  तुळजाभवानी मंदिर परिसरातील  कल्लोळ तीर्थ येथून सुरक्षारक्षक आपले कर्तव्य बजावून दुपारी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास जेवण करण्यासाठी तळमजला येथे जाताना पहिल्या मजल्यावर लिफ्ट गेट जवळ अंदाजे एक ते दीड तोळ्याचे अंदाजे किमत 60 ते 80 हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र तुटलेल्या अवस्थेमध्ये सापडले होते

 सदर सुरक्षा रक्षकाने सापडलेली मंगळसूत्र हे दर्शन मंडप नियंत्रण कक्ष कंट्रोल रूम इन्चार्ज यांच्या स्वाधीन प्रामाणिकपणे केले .मंगळसूत्र सापडलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव भिसे केदारनाथ नानासाहेब हे असून कोणताही मोह न ठेवता प्रामाणिकपणे जमा केल्याबद्दल त्याचा प्रामाणिकपणा पाहून संतोष पाटील तहसीलदार तथा व्यवस्थापक मंदिर संस्थान यांनी बीव्हीजी सुरक्षारक्षक भिसे केदारनाथ नानासाहेब याचा सत्कार केला यावेळी धार्मिक व्यवस्थापक श्री सिद्धेश्वर इंतोले, जनसंपर्क अधिकारी विश्वास सातपुते,बीव्हीजी सुपरवायझर बाळासाहेब बागल,सचिन पवार व इतर सुरक्षारक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments