तुळजापुर तालुक्यातील गंधोरा येथे फळदार वृक्ष वाटप आणि वृक्षारोपण व पर्यावरण विषयक चर्चासत्र व पोलीस अधीक्षकांचा यांचा सत्कार
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापुर: तालुक्यातील गंधोरा येथे श्री भवानी योगक्षेश्रम, गंधोरा यांचे विद्यमाने फळदार वृक्ष वाटप आणि वृक्षारोपण व पर्यावरण विषयक चर्चासत्राचे आयोजन दि,२६ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अधक्षस्थानी श्री योगी अरविंद हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पद्यश्री श्री. कल्याण सिंह रावत (देहरादुन) प्रमुख, मैती आंदोलन (माहेर वृक्ष चळवळ उत्तराखंड, पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी हे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ अनिकेत इनामदार, सपोनि श्री. स्वप्नील लोखंडे, पोउपनि श्री रियाज पटेल, सापंच बबीता राठोड, दयानंद वाघमारे, गणेश चादरे, विकास सोसायटीचे चेअरमन बाबुराव भोसले,धनाजी धोतकर अजित बरड हे उपस्थित होते. यावेळी उपस्थितीत मान्यवरांसह जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचा धाराशिव जिल्ह्यात वृक्ष लागवड आणि सेंद्रिय शेतीची लोकचळवळ उभी केल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.सत्कारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, श्री. कल्याण सिंह रावत, श्री योगी अरविंद उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मधुकर भोसले, सुदाम सुरवसे, रेवण साखरे, बळीराम भोसले, चंपाबाई भोसले यांना प्रतिनिधिक स्वरुपात वृक्ष वाटप करण्यात आले. त्यानंतर परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, श्री. कल्याण सिंह रावत यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाअधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी म्हणाले की, आरोग्य चांगले ठेवयाचे असले तर सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे त्याचबरोबर वृक्ष लागवड देखील तिकिीच महत्वाची आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. श्री. योगी अरविंद यांनी एक कोटी वृक्ष लागवड करण्याचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून जे काम चालू केले आहे त्याचे कॉतुक केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रसस्ताविक डॉ अनिकेत इनामदार यांनी केले. यावेळी शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments