तुळजापुर येथे जुगार अड्ड्यावर छापा, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या पथकाची कारवाई
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापुर प्रतिनिधी : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना ज्यादा पैशाचे आमीष दाखवून लोकांकडून पैसे घेऊन ते अंदाजीत येणारे मेन बाजार मटका जुगाराचे अंक आकड्यावर लावून खेळत व खेळवत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने छापा मारून रोख रक्कम,मोबाईल व जुगाराची साहित्य असे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.निलेश देशमुख यांच्या आदेशावरून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजून 55 मिनिटाच्या सुमारास तुळजापूर उस्मानाबाद रोड लगत श्री पान सेंटर चे बाजूस नाव नसलेल्या गुलाबी रंगाच्या पानटपरी मध्ये स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना जादा पैशाचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेवुन ते अंदाजीत येणारे कल्याण मेन बाजार मटका जुगाराचे अंक आकड्यावर लावुन खेळत व खेळवीत असताना दिसून आली त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने सदर ठिकाणी छापा मारला असता कल्याण मेन बाजार मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 4950,विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत अंदाजे 5000 रुपये असे एकूण नऊ हजार पाचशे पन्नास रुपये सह मिळून आला
अशा प्रकारची फिर्याद शिवशंकर संजीव पाटील वय 28 वर्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गोविंद संजय सातपुते रा . लामजणा ता.औसा जिल्हा लातूर सध्या मुक्काम वेताळ नगर तुळजापूर यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 350 /2023 नुसार महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हाचा पुढील तपास पोलीस हवलदार लोखंडे यांच्याकडे सदर देण्यात आला आहे .
सदर कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या आदेशावरून पोलीस हवलदार महेश चापेकर,पोलीस हवालदार महेश चाफेकर,पोलीस हवालदार नरसिंग पांढरे यांनी सदरची कारवाही केली .सदर कारवाई केल्यामुळे मटका माफीयांचे धाबे दणाणले असून नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख हे कारवाही करत असल्यामुळे अवैद्यरित्या धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत .
0 Comments