Hot Posts

6/recent/ticker-posts

कंचेश्वर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक

कंचेश्वर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक,आठ दिवसात बिल न दिल्यास करणार आंदोलन

धाराशिव : तुळजापुर तालुक्यातील मंगरूळ येथील कंचेश्वर साखर कारखान्याने ऊस गळीत हंगाम २०२२-२३ मधील सांजा गावातील शेतकऱ्यांना प्रति टन २५०० रुपये भाव देण्याचे ठरवले होते. म्हणून जवळपास १५० शेतकऱ्यांनी तीनशे एकर ऊस कारखान्यास गाळपासाठी दिला होता परंतु ठरल्याप्रमाणे भाव न देता प्रति टन २३०० रुपये भावाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली उर्वरित प्रति टन २०० रुपये न देता शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी (७)रोजी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कंचेश्वर साखर कारखाना मंगरूळ ता.तुळजापूर जिल्हा धाराशिव या साखर कारखान्यावर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा व होणाऱ्या आर्थिक फसवणुकीतून शेतकऱ्यांची सुटका करावी

प्रती टन २०० रुपये फरकाचे बिल आठ दिवसात शेतकऱ्यांना न दिल्यास कंचेश्वर साखर कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

यावेळी सांजा गावातील शेतकरी राकेश सूर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, कल्याण सूर्यवंशी,धनाजी सूर्यवंशी,संताजी सूर्यवंशी,काकासाहेब पाटील,शरद दहिवडकर, दत्तात्रय सूर्यवंशी आदींसह शेतकरीत उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव

Post a Comment

0 Comments