Hot Posts

6/recent/ticker-posts

रत्नत्रय एक अद्वितीय शिक्षण संस्था : समीर दोशी

नातेपुते : रत्नत्रय एक अद्वितीय शिक्षण संस्था : समीर दोशी 


नातेपुते प्रतिनिधी : रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे येथे प्रत्येक शनिवारी गेल्या पाच वर्षापासून फळ वाटपाचा स्तुत्यग उपक्रम सुरू आहे. समाजातील दानशूर व्यक्ती काही सु:खद प्रसंगाची आठवण किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना फळ वाटप करतात. शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी नातेपुते येथील रत्नत्रय प्रि इंग्लीश स्कूलचे सभापती श्री वैभव शहा यांच्या वाढदिवसानिमित्त राशीन येथील समीर दोशी यांच्या शुभहस्ते फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले"आज विचार आणि जीवन यात फरक आहे त्यामुळे विचार निर्जीव आणि जीवन विचार शून्य झाले आहे परिणामी आपण कोठे जात आहोत आणि काय करीत आहोत हे माणसाला कळेनासे झाले आहे त्यावर एकच उपाय म्हणजे शिक्षण. शिक्षणातून मानवाला संस्कार मिळतात त्यासाठी शाळेमधील वातावरण कुटुंबवत असणे गरजेचे आहे. अशाच प्रकारची रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे शाळा आहे. शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री प्रमोद भैय्या दोशी, विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संबंध किती प्रेमळ आहेत हे दिसून आले. त्यामुळे मलाही माझी बालपण आठवले. दोशी परिवाराने शिक्षणासाठी  स्वप्नवत कार्य केले आहे. या परिसरातील शिक्षणाची समस्या सोडवून रत्नत्रय हे एक शिक्षणाचे शक्ती पीठ निर्माण होत आहे . शाळेच्या परिसरामध्ये प्रवेश करताच शिक्षणाचा अल्लादायक सूर ऐकू आल्यामुळे मलाही स्फूर्तीदायक वातावरणात आल्याचे जाणवले. त्यामुळे ही एक अद्वितीय शिक्षण संस्था आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वैभव शहा  यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रमोद भैय्या दोशी, वैभव शहा, समीर दोशी, प्रीतम दोशी,  शिवकुमार साईकर, सौ. ऋतुजा दोशी, श्री रामभाऊ कर्णे, प्रतीक दोशी ,समन्वयक अमित पाटील सर,मुख्याध्यापक दैवत वाघमोडे  व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दैवत वाघमोडे ,सूत्रसंचालन अनिता वाघमारे , तर आभार प्रदर्शन समन्वयक अमित पाटील  यांनी केले.

Post a Comment

0 Comments