चिवरी परिसरात पावसाअभावी सोयाबीनच्या उताऱ्यात मोठी घट, सोयाबीनचे दरही घसरल्याने शेतकरी चिंतेत
चिवरी: तुळजापुर तालुक्यातील चिवरी व परिसरात सोयाबीन काढणीला वेग आला आहे. परिसरात सोयाबीन उताऱ्यामध्ये मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. परिसरातील आरळी ,येवती, काळेगाव, दिंडेगाव, बसवंतवाडी,चिंचोली आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले.
जुलै महिन्यामध्ये अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली होती. परंतु त्यानंतर पावसाने 25 दिवसापेक्षा जास्त खंड दिल्याने पिके पाण्याविना वाळून गेले. त्यातच आता शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली असता एकरी तीन ते चार क्विंटल सोयाबीन होत आहे तर काही शेतकऱ्यांना याहीपेक्षा कमी सोयाबीन होत आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर केलेला खर्चही निघणे अवघड झाले असून शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. तर बाजारपेठेत सोयाबीनला म्हणाव तसा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
0 Comments