पत्रकार धनंजय घोगरे हल्ला प्रकरणी आरोपीवर पत्रकार कायदा अंतर्गत कार्यवाही करावी कळंब पत्रकारांची निवेदनाद्वारे मागणी
कळंब \प्रतिनिधी :कळंब येथील पत्रकार धनंजय घोगरे ढोकी कडून कळंबकडे येताना माळकरांजा गावाजवळ अपघात झाला होता त्यानंतर सराईत गुंड मिठू मुंडे यांनी घोगरे यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या प्रकरणात कळंब येथील सर्व पत्रकारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन दिले असून सदर आरोपी विरुद्ध पत्रकार कायदया अंतर्गत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
अधिक वृत असे की , कळंब येथील पत्रकार धनंजय घोगरे हे (दि17) रोजी ढोकी कडून कळंबला येत असताना माळकरांजा गावाजवळ त्यांच्या दुचाकी ला पाठीमागून येणाऱ्या विजय कराड याने त्याच्या दुचाकीने जोराची धडक दिली होती त्या अपघातात घोगरे गंभीर जखमी झाले असतानाही त्या परिसरातील सराईत गुंडाने घोगरे यांना शिवीगाळ करून मारहान केली व जीवे मारण्याची धमकी दिली होती सदर प्रकरणी शिराढोण पोलिसात मुंडे व कराड यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे सदर प्रकरणी कळंब येथील पत्रकारांनी शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले असून त्या निवेदनात म्हटले आहे की घोगरे यांच्यावर हल्ला प्रकरणातील आरोपीवर पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करावा तसेच संघटित गुन्हेगारी कायदा लावावा त्याचबरोबर घोगरे यांच्यावर सदर गुंड पुन्हा हल्ला करू शकतो त्यामुळे घोगरे यांना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.
सदर निवेदनावर पत्रकार सतीश टोणगे, उन्मेष पाटील, धनंजय घोगरे , बालाजी अडसूळ ,मुस्तान मिर्झा ,शितल धोंगडे, मंगेश यादव, अमर चोंदे, संदीप कोकाटे, परमेश्वर पालकर ,ओंकार कुलकर्णी, बालाजी सुरवसे , माधव सिंग राजपूत, रसूल तांबोळी ,मनोज चोंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Comments