Hot Posts

6/recent/ticker-posts

विषय-- बलिदान|subject balidan

 विषय-- बलिदान

================



देशासाठी तुम्ही लढले

विरत्वाचे शौर्य महान

वसा घेतला देशभक्तीचा

व्यर्थ न हो बलिदान


====================

श्री. पंकज कासार काटकर(सहशिक्षक)

 मु.पो.काटी.ता.तुळजापुर


🌹🌹👍🙏🌹👍🙏

: दि.२६/११/२०१७

विषय- शौर्य तुझे वंदितो

====================

देशप्रेमाचे  हे जीवन तुझे

धडाडीचे तारुण तुझे

सदैव तयार रोम तुझे

शौर्य तुझे वंदिले ॥१॥


स्पंदनात देशभक्ती उदात्त तुझ्या

बाहुबळात देशभक्ती वणवा तुझ्या

कौतुक करु धाडसाचे खूप तुझ्या

शौर्य तुझे वंदितो॥२॥


येता संकट देशावर श्वास तुझे

मस्तकात आग वेदनामय राग तुझे

रक्तात देशसेवा रोमात शौर्य तुझे

शौर्य तुझे वंदितो ॥३॥


छातीचा करतो कोट तू

येता संकट लढतो वीर तू

वीरत्वाचे स्फुरण चढतो तू

शौर्य तुझे वंदितो ॥४॥


मरणास सदैव तयार तू

लढण्यास सदैव तयार तू

किती शौर्य,विरत्व मर्द तू

शौर्य तुझे वंदितो॥५॥


बलिदान हे तुझे देशासाठी

किती लढलास शुरपणे तू

ईतिहास रचला देशासाठी

शौर्य तुझे वंदितो ॥६॥


====================

श्री.पंकज राजेंद्र कासार काटकर

              सहशिक्षक

जि.प.प्रा.शा.काटी.ता.तुळजापुर

           जि.धाराशिव.

Post a Comment

0 Comments