रत्नत्रय पतसंस्थेच्या रत्नत्रय दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन
नातेपूते प्रतिनिधी : सदाशिवनगर येथील रत्नत्रय पतसंस्थेने काढलेल्या सन २०२४ या दिनदर्शिकेचे प्रकाशन रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल (दादा) दोशी यांच्या शुभ हस्ते व धर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन प्रताप सालगुडे पाटील प्रकाश होनराव माळशिरस, सदाशिवनगर ग्रामपंचायतचे सरपंच व चेअरमन विरकुमार दोशी ,रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी स.नगर सचिव प्रमोद दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात पार पडला.
यावेळी अनंतलाल दोशी म्हणाले की पतसंस्था स्थापनेपासूनच दरवर्षी सर्व सभासद व खातेदार यांना दिनदर्शिका मोफत देत असते गेली १४ वर्षे संस्था ऑनलाईन व्यवहार करत आहे संस्थे मार्फत सभासदांना डीडी काढणे, आरटीजीएस एनएफटी च्या माध्यमातून भारतात कुठेही पैसे ट्रान्सफर करणे,क्यू आर कोड च्या माध्यमातून पैसे काढणे ,पिग्मी मोबाईल च्या माध्यमातून गोळा करणे ,एसएमएस सुविधा अशा विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना व खातेदारांना पुरविल्या जातात त्यामुळे संस्थेचे व्यवहार सुरळीत चालू आहेत संस्थेकडे डिसेंबर अखेर २१ कोटी ठेवी असून कर्ज वाटप १८ कोटी आहे व संस्थेची एकूण गुंतवणूक ८ कोटी आहे पतसंस्थेची स्थापना परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे व त्यांची उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आली असून या संस्थेची प्रगती सर्व ठेवेदार संचालक व कर्मचारीवर यांचा मोठा सहभाग असूनही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे आर्थिक व्यवहाराबरोबर ही संस्था अनेक सामाजिक कार्य करून समाजसेवा करत आहे रत्नत्रय पतसंस्था ही दरवर्षी दिनदर्शिका काढत असते तसेच सर्व जाहिरातदारांच्या सहकार्याने दिनदर्शिका निघत आहे असेच प्रेम संस्थेवर राहावे त्याबद्दल सर्व जाहिरातदारांचे आभार संस्थापक अनंतलाल (दादा) दोशी यांनी मानले व सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक संजय गांधी, प्रमोद दोशी, सुरेश गांधी, संजय दोशी, जगदीश राजमाने विलास साळुंखे, सोमनाथ राऊत व सचिव ज्ञानेश राऊत उपस्थित होते सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले.
0 Comments