दारू पिऊन का आलास? म्हणत वीट फेकून मारली दोघाविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धाराशिव : दारू पिऊन का आलास अशी विचारणा करीत दोघांनी वृद्धास शिवीगाळ करून वीट फेकून मारली ही घटना तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथे घडली. या घटनेत 60 वर्षे वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे ही घटना 24 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संबंधित दोघा आरोपी विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की, दारू पिऊन घरी का आलास ? अशा शब्दात सचिन नागनाथ भोसले ,नितीन नागनाथ भोसले या दोघांनी नागनाथ गुंडू भोसले वय (६०) यांना जाब विचारला तसेच शिवीगाळ करून वीट फेकून मारून जखमी केले, हे संबंधित दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत तर ठार मारण्याची धमकी दिली ही घटना 24 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात संबंधित दोघाविरुद्ध 25 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments