तुळजापुर तालुक्यातील अनाधिकृत बेकायदेशीर विटभट्ट्या बंद करण्यात याव्या या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तुळजापुरच्यावतीने अर्धनग्न लाक्षणिक उपोषण सुरू
तुळजापुर : तालुक्यातील प्रदूषण महामंडळ लातूर यांचा परवाना नसताना तसेच तहसील कार्यालय तुळजापूर यांनी कोणत्याही प्रकारचा कायदेशीर परवाना दिला नसताना चालू असलेल्या तुळजापूर तालुक्यातील बेकायदेशीर अनधिकृत वीट भट्ट्याविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या वतीने दि,२० रोजी तहसील कार्यालय तुळजापूर समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये प्रदेश मुख्य संघटन गणीभाई मुलानी, बाळासाहेब पाटील तालुका संपर्कप्रमुख, निखिल मा. अमृतराव शहर प्रमुख, दत्तात्रेय गंगाराम सोनवणे जिल्हा अध्यक्ष माजी सैनिक, श्रीकांत सौदागर गाटे तालुकाध्यक्ष माजी सैनिक, नेताजी मधुकर शिंदे जिल्हा उपाध्यक्ष, नेताजी (बबन )शिंदे, गणेश पाटील, बालाजी जाधव ,कृष्णा शिंदे, मीरा वसेकर , उत्तम सगट, श्रीशैल मुळे, धनश्री मनोहर, आगळे लता, सुरेखा सोमनाथ अडसूळ, आदी पदाधिकारी उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत.
यामध्ये उपोषणकर्त्याच्या प्रमुख मागण्या
१) तुळजापूर तालुक्यातील विट भट्टी धारकानी प्रदुषण नियंत्रण महामंडळ लातूर यांचा प्रदूषण परवाना घेतलेला नाहीये अशा वीट भट्टी तात्काळ बंद करण्यात याव्या.
२) अनाधिकृत परवाना नसलेल्या विट भट्टया तात्काळ बंद करण्यात याव्या.
३) आत्तापर्यंत अनधिकृत पणे वीट भट्टी चालवणाऱ्या चालकावर महसूल बुडवल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
४) आता पर्यत वीट भट्टीचालकवर कार्यवाही न करणाऱ्या अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करा.
उपोषण स्थळी सहभागी झालेले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तुळजापूरचे सर्व पदाधिकारी
0 Comments