तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे १५८० नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क
चिवरी: उस्मानाबाद धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीचे मतदान दि, 7 रोजी तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे शांततेत पार पडले. एकूण 57% मतदान झाले आहे, येथील 2780 मतदारांपैकी 1580 नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी ऊन कमी असल्यामुळे मतदाराने मतदान केंद्रावर गर्दी केली होते. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या नंतर काही प्रमाणात गर्दी दिसून आली. महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील व महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात चुरस दिसून आली. प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील लोकसभेच्या तुलनेत यावेळीच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे.
0 Comments