Hot Posts

6/recent/ticker-posts

उन्हाळी सुट्टी लग्नसराईमुळे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदियाळी

उन्हाळी सुट्टी लग्नसराईमुळे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी मांदियाळी


धाराशिव : उन्हाळी सुट्टी रविवारची सुट्टी व लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे रविवार दिनांक 12 रोजी श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शणार्थ राज्यासह परराज्यातील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. देवीच्या दर्शनासाठी शनिवारी रात्रीपासून खाजगी वाहन व एसटीने भाविक तुळजापुरात दाखल होत होते.

रविवारी पहाटे एक वाजता चरणी तीर्थ होऊन धर्म दर्शनास आरंभ झाला तेव्हापासून भाविकांनी देवी दर्शनाचा गर्दी केली होती सकाळी सहा वाजता श्री तुळजाभवानी देवीची भाविकांचे दही दूध पंचामृत अभिषेक सुरू झाली. ती दहा वाजता संपल्यानंतर देवीची वस्त्र अलंकार घालण्यात आले त्यानंतर आरती करण्यात आली ,दुपारी एक ते चार वाजेच्या दरम्यान असाह्य उकड्याच्या पार्श्वभूमीवर देवीजीस मखमली पंख्याने वारे घालण्यात आले. आज धर्म मुख अभिषेक सशुल्क दर्शन रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या .श्री तुळजाभवानी दर्शनानंतर ही भाविकांनी बाजारपेठ जाऊन प्रसाद साहित्य मूर्ती फोटो खरेदीसाठी गर्दी करत असल्यामुळे दुपारनंतर बाजारपेठेही भाविकांनी फुललेली चित्र दिसून येत होती भाविक मोठ्या संख्येने खाजगी वाहनाने आल्यानंतर तीर्थक्षेत्र तुळजापूरला रविवारी वाहन तळ्याचे स्वरूप आले होते. जुने बस स्थानक चौक परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे तुळजापूर येथील वाहन तळे वाहनांनी भरून वाहने महामार्ग व शहरातील रस्त्यावर सर्वत्र जिथे जागा मिळेल तिथे उभे करण्यात आली होती याचा त्रास भाविकांना मंदिर ये जा करताना सहन करावा लागला रात्री प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर बंद करण्यात आले. हा भाविकांचा ओघംशाळा सुरू होईपर्यंत राहणार आहे.


Post a Comment

0 Comments