नागठाणेमध्ये अभय ग्रुप कडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम
सातारा : मौजे नागठाणे वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे हीच गरज लक्षात घेऊन नागठाणे गावातील अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळ नागठाणे यांच्याकडून दिनांक 7 जुलै 2024 रोजी नागठाणे गावातील महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण करण्यासाठी वनविभाग सातारा व नागठाणे ग्रामपंचायत यांच्यामार्फत वृक्ष मोफत मिळाली या कार्यक्रमासाठी नागठाणे ग्रामपंचायत व अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळ यांच्या सहकार्याने महादेव मंदिर परिसरात जेसीबी च्या साह्याने छोटे छोटे खड्डे घेऊन अभय ग्रुपच्या सभासदांमार्फत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण साळुंखे युवा नेते पंकज साळुंखे प्राध्यापक किशोर साळुंखे अभय ग्रुपचे सचिव तुकाराम निकम व आदी सभासद उपस्थित होते.
प्रतिनिधी संजय निंबाळकर
0 Comments