मुंबईला जाण्यासाठी पुन्हा तयार राहावे ! हिंगोलीतील संवाद यात्रेत मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आव्हान
हिंगोली : सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावे मला एकटे पाडण्याचा प्रयत्न होत असून आरक्षण तर मिळवणारच असे सांगत मुंबईला जाण्यासाठी मराठा समाजाने पुन्हा तयार राहावे आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचेच नाही अशी आव्हान हिंगोलीत पार पडलेल्या संवाद रॅलीत बोलताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी केले.
सगेसोयरे कायदा अंमलबजावणीच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रात एकूण होणाऱ्या जनसंवाद रॅलीचा शुभारंभ हिंगोलीत शनिवारी पार पडला या जनसंवाद रॅलीचे इंदिरा चौकात सभेत रूपांतर झाले .यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकारने आता शहाणपणाची भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे माझ्या समाज बांधवांना राजकारणात जायचे नाही राजकारणात करण्याची इच्छा नाही मराठा कुणबी एकच असल्याने आता मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे छत्रपती शाहू महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण दिले सरकारने मात्र आता प्रतीक्षा करू नये .13 तारखेच्या आत ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावे नंतरच्या निर्णय सरकारला झेपायचं नाही असे ठणकावून सांगितले यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही शेरपाडण्याचाले. परंतु गोरगरीब मराठा व ओबीसी यांनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये आमचे आरक्षण रद्द कराल तर आम्ही मंडळ आयोग पाहू असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मराठा समाजातील जमलेल्या तमाम जनसागराला मुंबईला पुन्हा येणार का अशी त्यांनी हाक देताच लाखोच्या जनसमुदायांनी हो म्हणत होता प्रतिसाद दिला मराठ्यांनी यापुढे कोणाचा अपमान करायचा नाही आणि सहनी करायचा नाही असे सांगत शेवटी मराठ्याला ताकद देण्याची हीच वेळ आहे असे सांगून आमदार खासदारांनी पाठिंबा द्यावा अशी आव्हान त्यांनी यावेळी केले. मला एकटे पाडण्याच प्रयत्न होत आहेत पण मला साथ द्या अशी सांगत म्हणून जरांगे पाटील खूपच भावुक झाले त्यांच्या डोळ्यात अश्रू तरावली होते ते पण लाखो मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
आम्ही दिलेल्या व्याख्या प्रमाणे आरक्षण द्यावे माळी समाजाला आरक्षण देऊन त्यांच्यासोबत त्या समाजाच्या उपजातीला देखील आरक्षण दिले व्यवसाय एक ,नातेगोते एक, जात एक मग 180 जातीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या
मनोज जरांगे पाटील
0 Comments