नाईचाकूर : जिल्हा परिषद प्रशाला नाईचाकुरच्या माजी विद्यार्थ्यांनी तीस वर्षानंतरच्या जुन्या आठवणींना दिल्या उजाळा
नाईचाकूर प्रतिनिधी : उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला नाई चाकूर 1994-95 दहावी वर्षाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला तब्बल तीस वर्षांनी वर्गमित्र मैत्रिणीची भेट झाली दीपावली सणाला मुली आपल्या माहेरी येतात बाहेरगावी असले मुले हे आपल्या गावी येतात त्यामुळे भाऊबीज झाली दुसऱ्या दिवशी 1994 95 च्या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आनंदात संपन्न झाला या मेळाव्याला तत्कालीन जिल्हा परिषदचे माजी शिक्षकांना पण आमंत्रित केले होते या विद्यार्थ्यांचे आमंत्रणाला मान देऊन माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आयोजित नाई चाकूर केला होता सकाळी मेळाव्यास सुरुवात झाली आपले मित्र मैत्री तब्बल तीस वर्षांनी भेट होणार आहे म्हणून आनंदाने शाळेचे दिशेने माजी विद्यार्थी येत होती एकमेकाला पाहून हसत होती एकमेकाची ओळख करून देत होते तेव्हाचा चेहरा पट्टी आत्याची चेहरा पट्टी जमीन असमानता फरक आहे असे एकमेकाला आनंदाने सांगत होते.मैत्रिणी एकमेकाला विचारत होते आज तू कुठे आहे तू कशी आहेस तू काय व्यवसाय करत आहे असे सांगते एकमेकांना आनंदाने विचारपूस करत होते शाळेतील गप्पा रंगल्या माझी शिक्षक, राम चव्हाण, नारायण कदम, पडोळे,बिराजदार ,लोखंडे, माळी मघे या शिक्षकांचे आगमन झाले माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे टाळ्या वाजवून स्वागत केले .,त्यानंतर शिक्षकांचा पात्र परिचय करून त्यांचा सन्मान करण्यात आला प्रास्ताविक आत्माराम गव्हाळे यांनी केले प्रास्ताविकाला करताना आत्माराम गव्हाळे यांनी शिक्षकांनी आम्हाला घडविले आदर्श व्यक्ती बनण्याचे धडे दिले.
आम्हाला छडीचा मार दिला आम्ही म्हणून आम्ही आज आमच्या वर्गातील काही आदर्श शेतकरी आहेत प्राध्यापक आहेत शिक्षिका आहे शिक्षक आहेत इंजिनिअर उत्कृष्ट ग्रहणी आदर्श असे विद्यार्थी आहेत.विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर उभा आहे असे सर्व शिक्षकांना सांगितले चव्हाण चव्हाण कदम हे खेळाचे शिक्षक नव्हते पण त्यांनी खेळाची आवड होती म्हणून खोखो कबड्डी इतर सांघिक खेळ खेळून आपले नाव लोकीककेले बरेच विद्यार्थी जिल्हा परिषद चे राज्यस्तरीय खोखो कबड्डी संघात खेळले आहे विठ्ठल पालम पले आपले मनोगत व्यक्त करताना मी शिक्षण घेत असताना माझी गरीब परिस्थिती होती पण तत्कालीन शिक्षकांनी आम्हा गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकाची व वह्यांची सोय केली म्हणून आम्ही शिकलो आज मी जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक आहे फक्त गुरुजनामुळे आहे.
त्यानंतर जिल्हा परिषद च्या शिक्षिका सुवर्णा भोसले ,लोखंडे गुरुजी आपले मनोगत व्यक्त करताना आम्ही तुम्हाला छडीचा मार देत होतो यासाठी की कुंभार मडके बनवीत असताना वरील बाजूने त्यांच्या थापिने बडवत असतो पणतू मधून त्याचा मायेचा हात असतो त्याला त्या मडक्याला आकार देतो तसंच आम्ही छडीचा मार देत होतो तुम्ही शिकावं तुम्ही मोठे व्हा आमचे नाव लौकिक व्हावं यासाठी आम्ही तुम्हाला चांगले संस्कार लागावे तुम्ही अभ्यास करावा छडीचा मार दिला तुम्ही व चांगल्या पदावर हात म्हणून आम्हाला तीस वर्षानंतर या जिल्हा परिषद शाळेत पुन्हा एकदा बोलताना आमचा सन्मान केला त्यातच आमचे समाधान आहे आज आम्ही शिकविलेला कष्टाचे फळ आम्हाला भेटले असे सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी पण आपल्या गुरुजनांना दीर्घ आयुष्य लाभ होण्याच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी सुवर्णा माने सत्यवती स्वामी गुणवंत पवार आत्माराम गव्हाळे विठ्ठल पालम पले इतर विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणी सांगितल्या जरी आम्ही तीस वर्षानंतर सरांच्या समोर उभे टाकत आहोत तरी आमचे आज हात पाय थरथरा कापत आहेत असे आत्माराम गव्हाळे यांनी म्हटले आत्ताचे विद्यार्थी हे शिक्षकाच्या समोरून जातात आणि आम्ही शिक्षकाच्या समोर कधीच जात नव्हतो शिक्षक आले म्हणले चड्डी सावरत आम्ही गल्लीबोळातून पळत जायचं आज पण तीस वर्षांनी सरांना आम्ही भेटतोय तरी आमच्या त्यांच्या समोर जाण्याची धाडस होत नाही आनंदमय वातावरणात तीस वर्षानंतर स्नेह मेळावा उत्साहात साजरा झाला.
अध्यक्ष म्हणून बिराजदार सर होते कार्यक्रमाला माजी विद्यार्थी ज्योती पवार, सत्यवती स्वामी, मायादेवी स्वामी ज्योती गोविंदराव पवार, कार्तिकी ताजवे, संगीता पवार, अफसर शेख ,सावित्रा पवार संगीता पवार, मेघा इंगळे, सुवर्णा माने कौशल्या डिगोळे, साधना पवार सुनिता पवार मायादेवी स्वामी विठ्ठल पालमपल्ले ,व्यंकट पवार, रणजीत काळे, माधव पवार, चंद्रकांत स्वामी, आत्माराम गव्हाळे ,गुणवंत पवार, गोविंद करनुरे, दशरथ करनुरे, रमेश काजळे, दीपक इंगळे, दत्ता उबाळे, आत्माराम गव्हाळे ,विठ्ठल माने, राजेंद्र मकाळे जिल्हा परिषदचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत पवार यांनी मांडले आभार सत्यवती स्वामी यांनी मांडले प्रास्ताविक आत्माराम गव्हाळे यांनी केले.
0 Comments