चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा धारदार शस्त्राने निर्घृण खुन ,तुळजापूर तालुक्यातील घटना
धाराशिव : चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील नळदृग येथे घडली आहे. तसेच पतीने स्वतःवरही वार करून घेतले आहेत पती गंभीर जखमी झाला असून ही थरारक घटना नळदृग येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवार दिनांक पाच रोजी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नळदृग येथील घरकुल मध्ये अब्दुल वहीम बिलाल कुरेशी वय (45 )व त्याची पत्नी सुलताना अब्दुल वहीम कुरेशी वय 40 या आपल्या मुलासह वास्तव्यास होत्या. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्यांनी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर चहाची टपरी लावली होती. गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी त्यांची चहाची टपरी होती. अब्दुल वहीद बिलाल कुरेशी हा पत्नी सुलताना यांच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत होते. मंगळवारी त्यांची नेहमीप्रमाणे चहाची टपरी चालू होती. दुपारी दोन वाजता सुमारास या नवरा बायको मध्ये भांडण सुरू झाले. भांडण इतके इकोपाला गेली की संतप्त झालेल्या अब्दुल वहीम बिलाल कुरेशी यांनी त्यांची पत्नी सुलताना यांच्यावर सपासप चाकूने वार केले. यामध्ये सुलताना यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून अब्दुल यानेही स्वतःवर वार करून घेतले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे . या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली, घटनेची माहिती मिळताच तातडीने नळदृग पोलीस ठाण्याचे गजेंद्र सरोदे पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नगरे व सहकारी पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्याने गंभीर जखमी झालेल्या अब्दुल वहीम बिलाल कुरेशी यांना उपजिल्हा रुग्णालय नळदृग येथे दाखल केले या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments