Hot Posts

6/recent/ticker-posts

भूम तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ज्वारीला पाणी देताना शेतकऱ्यावर हल्ला शेतकरी गंभीर जखमी, परिसरातील शेतकरी शेतमजुरासंह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भूम तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ ज्वारीला पाणी देताना शेतकऱ्यावर हल्ला शेतकरी गंभीर जखमी, परिसरातील शेतकरी शेतमजुरासंह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


धाराशिव : गेल्या महिनाभरापासून भूम परंडा वाशी तुळजापूर तालुक्यामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला तर भूम येथे म्हशीच्या रेटकाचा बिबट्याने फरशा पडला आहे. परंडा मतदार संघात बिबट्यांचा हहिदास सुरू असताना वन विभागाला मात्र बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यश आले नाही त्यामुळे शेतकरी अंत भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी ग्रामस्थातून होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी विजय सोमनाथ माने वय (40) बुधवारी रात्री ज्वारीला पाणी  देण्यासाठी शेतात गेले होते दरम्यान गुरुवारी दिनांक 12 रोजी पहाटे चार वाजता सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले .तसेच शहरातील माऊली मंदिराजवळ ओम पिसाळ यांच्या एका म्हशीच्या रेडकावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये ते रेडूक जागीच ठार झाले. ही घटना बुधवार दिनांक 11 रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या  सुमारास घडली . या दोन्ही घटनेने शेतकरी शेतमजूर व पशुपालक यांच्यामध्ये भीती व दहशतीचे वातावरण पसरले आहे .मात्रेवाडी येथील शेतकरी विजय माने व त्यांचे बंधू सागर माने हे दोघे भाऊ मात्रेवाडी शिवारातील त्यांच्या शेतामध्ये ज्वारीच्या पिकास पाणी देण्यासाठी गेले होते पहाटेच्या सुमारास दोघांना झोप लागल्याने ते ज्वारीमध्ये एका ठिकाणी झोपले होते याच वेळी सागर यास जाग आल्याने तो ज्वारीचे पाणी वाढवण्साठी विजय झोपलेल्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर गेला तो पाणी वळवत असतानाच त्याला रामू बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज आला त्याने तात्काळ गावाकडे धाव घेतली त्यावेळी बिबट्या हा विजेवर हल्ला करीत असल्याचे सागर या दिसून आले त्याने मोठ्याने आर्डावर करीत बॅटरी बिबट्याच्या डोळ्यावर चमकवी हातातील फावड्याने बिबट्यास मारले यावेळी बिबट्या पळून गेला आणि विजय यांचा जीव वाचला या हल्ल्यात विजय यांच्या डाव्या खांद्यास व पाठीच्या डाव्या बाजूस बिबट्याच्या दांतामुळे मोठ्या जखमा झाली आहेत विजय यास तातडीने भूम ग्रामीण रुग्णालयात पहाटे पाच वाजून 40 वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत खराडे यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले मात्र त्यांच्या चकलीतून होणारच थांबत नव्हता त्यामुळे त्यांनी तातडीने विजय यास पुढील उपचारासाठी बार्शी येथील खाजगी रुग्णालयात पाठवले तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बार्शी येथे जाऊन बाणेर यांनी यांची भेट घेतली या दोन्ही घटनेने भूम शहर व तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण पसरले आहे एकीकडे वन विभाग अद्यापही तो बिबट्याचा आहे का याची खात्री जमा करण्यात दंग आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करीत आहे फक्त आतापर्यंत जनावरती हल्ले झाले मात्रेवाडी येथील हल्ला बिबट्याने मनुष्यावर केलेली शेतकरी पशुपालक शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments