Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला खेड्यातील जनजीवन विस्कळीत

धाराशिव: जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला खेड्यातील जनजीवन विस्कळीत


धाराशिव: उत्तरेकडून अतिशय थंड वारे वाहत असल्याने राज्यात थंडी वाढत आहे राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे पश्चिम महाराष्ट्र बरोबरच मराठवाड्यातील जिल्ह्यातील ही किमान तापमानात घट झाली आहे धाराशिव जिल्ह्यासह  तालुक्यात येथील किमान तापमान 12 अंशापर्यंत घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे.

मागील चार दिवसापासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे राज्यातील तापमान झपाट्याने घट होत आहे. डिसेंबर महिन्यातील निश्चयांकित तापमानाची नोंद झाली आहे. खेडोपाडी शेकोटी पेटल्या आहेत ,एरवी मोबाईल मध्ये दंग असलेली तरुणाई आता शेकोट्याभोवती दिसू लागली आहे.

थंडीचा जोर वाढल्याने सायंकाळी सात नंतर गावाची पार ओस पडलेली आहेत पण शेकोटीच्या निमित्ताने गेल्या चार-पाच दिवसात मात्र ग्रामस्थ एकत्र येऊन गप्पा मारताना दिसत आहेत सकाळी देखील उशिरापर्यंत गारठा  जाणवत असल्याने खेड्यातील जनजीवन उशिरा सुरू होत असल्याचे दिसून येत आह.

Post a Comment

0 Comments