हजारो गुंतवणूकदारांना गंडवणारा फिनॉमिनल हेल्थ केअर कंपनीचा चेअरमन नंदकुमार ठाकूर यांची चौकशी करून पैसे परत मिळवुन द्यावे : आपचे मधुकर शेळके यांची मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
धाराशिव : मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात लाखो रुपये घेऊन अनेक नागरिकांचे फसवणूक करुन गुंतवणूकदारांना गंडवणारा फिनॉमिनल हेल्थ केअर कंपनीचा चेअरमन नंदकुमार ठाकूर यांची चौकशी करून पैसे परत मिळून द्यावे यासाठी आपचे मधुकर शेळके यांनी दि,२१ रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की ,फिलिमिनल हेल्थकेअरचे चेअरमन नंदकुमार केशव सिंग ठाकूर यांनीी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये अनेक लोकांचे नागरिकांचे लाखो आणि कोट्यावधीची रुपये घेऊन फसवणूक केली आहे या संदर्भात लातूर येथे सन 2018 मध्ये श्री नंदकुमार केशव सिंग ठाकूर यांना अटक करण्यात आली होती यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनच्या जबाब कबुली दिलेली आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो रुपये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना आज तागायत कोणतीही पैसे मिळाले नाहीत तरी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांची संबंधित प्रशासनकडून माहिती घेऊन वरील संदर्भात तात्काळ चौकशी करावी असे निवेदनात नमूद केले आहे.या निवेदनावर मधुकर बबनराव शेळके उपाध्यक्ष जिल्हा आम आदमी पार्टी श्री किरण माणिकराव यादव शहराध्यक्ष यांची स्वाक्षरी आहे.
0 Comments