Hot Posts

6/recent/ticker-posts

संतापजणक: तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार नराधम तरुणासह अटक

संतापजणक: तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार नराधम तरुणासह अटक  


धाराशिव : घरात खेळण्यासाठी आलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर 23 वर्षे तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरात घडली आहे ही घटना दिनांक 18 रोजी सायंकाळी घडली असून याप्रकरणी सदर तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून झालेल्या सविस्तर माहिती नुसार धाराशिव शहरातील एका 23 वर्षे तरुणाने आपल्या घराजवळ राहणाऱ्या नियमित घरी खेळण्यास येणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीस आपल्या घरातील बेडरूम मध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला .,ही घटना दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली आहे हा घडला सर्व प्रकार चिमुकली घरी आल्यानंतर तिला त्रास होत असल्याने आईस सांगितल्यानंतर उघडकीस आला. या घटनेमध्ये धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुणाने घरात आई वडील बहीण आदी सदस्य हॉलमध्ये बसलेले असताना त्या चिमुकलीला खेळण्याच्या बहाण्याने बेडरूम मध्ये नेऊन हे ग्रहणास्पद कृत्य केले.

चिमुकली त्रास होत असल्याने ती रडू लागल्यानंतर तिला घरी पाठवले तरी घरी गेल्यानंतर चिमुकलीने घडला प्रकार आईस सांगितल्यानंतर याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत कलमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे .अवघ्या  तीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments