Hot Posts

6/recent/ticker-posts

तुमचाही मस्साजोगचा संतोष देशमुख करू., माजी मंञी तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना जिवे मारण्याची धमकीचे पञ-tanaji sawant-dhanjay sawant


धाराशिव : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तथा आमदार तानाजीराव सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व तेरणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत या दोघांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रविवारी दिनांक २२ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कारखान्यावर ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर जवळून आलेल्या दोघांनी एक बंद पाकीट देत त्यामध्ये तुमचा सरपंच संतोष देशमुख  मस्साजोग  केला जाईल असे धमकावण्यात आले आहे.

सदरील पत्र ट्रॅक्टर चालकांनी गेटवरील सुरक्षारक्षकाकडे दिल्यानंतर याप्रकरणी पोलीस ढोकी पोलीस  ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ट्रॅक्टर चालक गोपाळ प्रकाश आडे राहणार (पुसद) हे रविवारी रात्री तेथून ढोकीच्या दिशेने गाळपासाठी ऊस घेऊन निघाली होते ते मुळेवाडी पाटीवर असताना पाठीमागून युनिकॉर्न दुसाकीवरून तोंडाला बांधून आलेल्या दोघांनी आडे यांना थांबवत त्यांच्या हातात एक बंद पॉकेट दिले व ते त्यांना कारखान्याचे गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यास सांगून चेअरमन यांना तात्काळ पोहोचवण्यास सांगितले.

त्यानुसार चालक आडे यांनी गेटवर सदरील पाकीट सुरक्षा रक्षक संजय निपाणीकर व सुनील लंगडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात अज्ञात दोघांनी चेअरमन यांना देण्यास सांगितल्याचे सांगितले त्यामुळे सुरक्षारक्षकाने ते पाकीट कारखान्याचे शेतकरी अधिकारी मच्छिंद्र पुंड यांच्याकडे दिले श्री पुंड यांनी ते उघडून पाहिले असता त्यात शंभर रुपयाची एक नोट व धनंजय सावंत व तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत या दोघांचा सरपंच संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल असा मजकूर लिहिलेली ठार मारण्याची धमकी देण्यात आली या धमकीच्या चिठ्ठी मुळे मोठी खळबळ उडाली आहे याप्रकरणी सुरक्षा गार्ड संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात इसमावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालकाला सोबत घेत पोलिसांकडून तपास

दरम्यान या धमकीच्या पत्रानंतर ढोकी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत त्यांनी ट्रॅक्टर चालक आडे यांना सोबत घेऊन सोमवारी दिवसभर घटनास्थळ तेर व परिसरात तपास केला काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली परंतु त्यांना कोणताही सुगावा लागला नसल्याचे कळते मला बांधून आलेले असल्यामुळे ओळख पटवणेही अवघड झाले आहे.


Post a Comment

0 Comments