पोलिसांच्या तत्परतेमुळे अर्ध्या तासात मोहोळ येथून ताब्यात
धाराशिव : सध्या सोशल मीडियाची लहान मुलावर होणारे परिणाम आपण सातत्याने पाहतोय असाच एक नवीन प्रकार उमरगा तालुक्यात समोर आला आहे कोरियन सिंगर व डान्स ग्रुपच्या प्रेमात पडलेल्या तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचत दक्षिण कोरिया ला जाण्याचा प्लॅन आखला परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या तीस मिनिटात या तिन्ही मुलींना मोहोळ जवळ पुणे बस मधून ताब्यात घेत पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना शुक्रवारी दिनांक रोजी उमरगा तालुक्यातील तुरोरी गावाजवळील निलुनगर तांडा येथे घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील निलुनगर तांड्यातील 11 ते 13 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन शाळकरी मुली या तुरोरी येथे शिक्षणासाठी आहेत त्यांनी शुक्रवारी एकीच्या वडिलांना मोबाईलवर संपर्क साधत आम्हाला शाळा सुटल्यानंतर तुरोरी येथून एका पिवळ्या रंगाच्या स्कूलबस मधून काही लोकांनी अपहरण करून घेऊन जात आहेत आमच्या गळ्यावर चाकू लावलेला आहे असे सांगितले या घटनेने घाबरलेल्या वडिलांनी तात्काळ उमरगा पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.
बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल योगेश बिराजदार यांनी मुलींनी कोणत्या क्रमांकावरून फोन केला तो क्रमांक मिळवून तातडीने त्याची लोकेशन ट्रेस केले तेव्हा सदरील फोन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावाजवळ असल्याचे दिसले. त्यानुसार पोलिसांनी सदरील माहिती तेथील पोलिसांना देऊन मुली बाबत तपास करण्यास सांगितले त्यानुसार केलेल्या तपासणीत या तिन्ही अल्पवयीन मुली पुणे बसणे पुण्याच्या दिशेने निघाल्याचे समोर आले या सर्वांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर उमरगा पोलीस व पालकांनी मोहोळ पोलीस ठाणे गाठून त्या तिन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेत आपले गाव गाठले पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी घटनेची गांभीरे ओळखत तपास केला व मुलींची सुखरूप सुटका करीत पालकांच्या स्वाधीन केले.
उमरगा पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करीत अवघ्या 30 मिनिटाच्या आत तीन अल्पवयीन मुलींचा अपहरणाचा बनाव उघड करत त्यांचा शोध घेतला हे कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गोहर हसन, व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पिराजी तायवाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर पुजेरवाड, पोलीस नाईक अनिरुद्ध कावळे पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश बिराजदार पोलीस हेडकॉन्स्टेबल बळीराम सोनटक्के यांनी केली.
मुलींना जायचे होते दक्षिण कोरियालातिन्ही मुलींना अपहरणाचा बनाव करून स्वतः फोन केला त्यांना पुणे येथे जाऊन पैसे कमवायचे व तेथून दक्षिण कोरिया ला जाण्याचा त्यांचा प्लॅन होता. या मुली कोरियन सिंगर व डान्स ग्रुपच्या फॅन होत्या कोणत्याही स्थितीत या ग्रुपला भेटायचे असे म्हणत त्या तिघींनी आपल्याच अपहरणाचा प्लॅन रचला व घरातून पळ काढला. प्रथम पुणे येथे जायचे तेथे पैसे कमवून पुन्हा दक्षिण कोरियाला जाऊन सिंगर ग्रुप ला भेटायची असा प्लान त्यांचा असल्याचे त्यांनी तपास दरम्यान पोलिसांना सांगितले.
0 Comments