Hot Posts

6/recent/ticker-posts

बावी शिवारात वाघाने केली गाईच्या वासराची शिकार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण-Tiger entry Dharashiv taluka washi

बावी शिवारात वाघाने केली गाईच्या वासराची शिकार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण-


 

धाराशिव : वाशी तालुक्यातील बावी येथील शेतकरी जयराम दत्तू कवडे यांच्या उसाच्या फडामध्ये वाघाने गाईच्या वासराची शिकार करत फडशा पाडल्याची घटना शनिवारी दिनांक 28 रोजी रात्री घडली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.

याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्याकडून मिळाली अधिक माहिती अशी की वाशी तालुक्यातील बावी शिवारात कवडे यांच्या शेतातील उसाच्या फडामध्ये मांडवा येथील शेतकरी पापा काजी यांच्या गाईचे वासरू वाघाने आणून मारून अर्धवट खाल्लेले अवस्थेत टाकून दिले. बावी व मांडवा या दोन्ही गावच्या सीमेवर ही घटना घडली आहे यामुळे दोन्ही गावातील शेतकऱ्यांमध्ये वाघाची दहशत पसरली आहे शेतकऱ्यांनी याबाबत वन विभागात संपर्क करून बोलवून घेतले वन विभागाचे अधिकारी शिवारात दिवसभर फिरत असून त्यांनी पंजाचे ठसे घेतले आहेत सदरील ठसे वाघाची असल्याचे सांगितले आहे तसेच बावी व मांडवा गावातील नागरिकांना कोणीही संध्याकाळी सहा वाजेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत शेतामध्ये थांबू नये तसेच गावातील झालेली शिकार ही बिबट्याने केलेली नसून वाघाने केलेली आहे असा संदेश वनविभाग तपासणी पथकामार्फत देण्यात आलेला आहे. दरम्यान परिसरामध्ये बिबट्या व वाघाचे वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत यासंबंधी तात्काळ वन विभागाने या हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

Post a Comment

0 Comments