तुळजापूर तालुक्यातील रब्बी ज्वारी जोमात !
शेतकऱ्यांना यंदा रब्बी पिकातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा-
तुळजापूर: यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेली पिके भरली असून ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत तर काही कंसाच्या वस्तीत आहे काही ठिकाणी ज्वारीचे कणसे परिपक्वतीच्या अवस्थेत आली आहेत सध्या थंडी चांगली असल्याने मार्च महिन्यापासून ज्वारी काढण्यास सुरुवात होईल अशी शक्यता शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान ज्वारीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे रब्बी हंगामातील गहु, हरभरा पिके जोमात आहे.
गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी अधिक होत असल्याने ज्वारीवर रोग किडीचा प्रादुर्भाव झालेले शेतकऱ्यांनी वेळेत योग्य त्या उपयोजनात केले आहे त्यामुळे योग्य किडीचा फारसा प्रादुर्भाव झाला नसल्याने पिके चांगली दिसत आहेत . अनेक ठिकाणी पिके जोरदारपणे आली आहेत मान्सून उत्तर पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी हंगामात उशिराने रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत सध्या बागायती भागातील परिसरात गहू हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत असून ज्वारीची पिके कणसाच्या वाढीच्या अवस्थेत आहेत.
यंदा सुरुवातीपासूनच पाऊस झाला असल्यामुळे जमिनीत अधिक ओल असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या केल्या आहेत; त्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे तालुक्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने खरीप पिके बहुतांशिवाय गेली होती .त्याचबरोबर सोयाबीन तूर मूग उडीद आदी पिकातून जेमतेम उत्पन्न हाती आली होते. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपाची तुट भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात पिकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुबलक पाणी असल्याने तालुक्याला रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. यात ढगाळ वातावरण व हवामान बदलामुळे रब्बी पिकावरील मोठी रोगराई वाढली आहे यासाठी शेतकऱ्यांकडून महागडी कीटकनाशके फवारणी करण्याचा बोजा बसला आहे. सद्यस्थितीत रब्बीचे पिके काही ठिकाणी जोमदार आले आहेत तर काही ठिकाणी शेतकरी नगदी पीक म्हणून उसाची लागवड करत आहेत तुळजापूर तालुक्यात ज्वारी पिकांसह रब्बीचे पिके जोमात बहरली आहेत.
0 Comments