Hot Posts

6/recent/ticker-posts

निरोगी आरोग्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर-nirogi Aarogyasathi Akrod Khane Faydeshir

 निरोगी आरोग्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर-nirogi Aarogyasathi Akrod Khane Faydeshir


नमस्कार आज आपण अक्रोड या फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत

आहारामध्ये नियमित स्वरूपात अक्रोड चा वापर केल्यास भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत असणाऱ्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार कर्करोग आणि मधुमेह या आजारापासून दूर राहणे शक्य असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकाने सांगितले आहे. आहार हृदय व रक्तवाहिन्या आकलन क्षमता अल्झायमर आणि मधुमेह या क्षेत्रातील संशोधक आणि वैद्यकीय तज्ञाच्या झालेल्या बैठकीमध्ये भारतातील आरोग्य स्थिती आहार घेण्याची पद्धत आरोग्य ची स्थिती आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे.

कॅलिफोर्नियाच्या अक्रोड आयोगाने आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेत अक्रोड हे रोग प्रतिबंधक असून त्यामुळे नागरिकांची जीवनशैली निरोगी राहण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले .संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये अक्रोड खाण्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत अक्रोड खाल्ल्यामुळे आरोग्य विषयक समस्या जसे की हृदय विकार कर्करोग वृद्धत्व आणि मधुमेह दूर होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

लठ्ठपणा उच्च रक्तदाब मधुमेह हद्यविकारसंबंधी   आजार भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत प्रामुख्याने शहरी भागातील नागरिकांमध्ये योग्य प्रमाणात आहार घेतला जात नाही त्यामुळे शरीराला आवश्यक ते पोषक घटक मिळत नाहीत लहान मुलांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे असे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्लीच्या माजी मुख्य आहार तज्ञ डॉक्टर रेखा शर्मा यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि चीन नंतर लठ्ठपणा असलेल्या देशात भारतीय यादी तिसऱ्या क्रमांकावर आहे भारतीय लोकांनी आहारामध्ये जास्तीत जास्त फळे भाज्या शेंगदाणे आणि सुकामेवा यांचा वापर करणे आवश्यक असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

सुकामेवा हा फॅटी ऍसिड चा समृद्ध स्रोत आहे तसेच यामध्ये ओमेगा तीन फॅटी आहे त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. असे त्या म्हणाल्या, भारतामध्ये स्मृतीभ्रंश आजार 10 टक्क्यांनी वाढला असून 2010 च्या तुलनेत या आजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अक्रोड खाणे यावर फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments