Hot Posts

6/recent/ticker-posts

दुर्दैवी घटना : नाशिक मध्ये नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

दुर्दैवी घटना : नाशिकमध्ये नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी, तर नंदुरबारात बालकाचा गळा चिरल्यामुळे अंत 


नाशिक: पतंगाच्या घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजाने उत्तर महाराष्ट्रात मंगळवारी दोन बळी घेतले त्यात नाशिक शहरातील युवकाचा व नंदुरबार येथील सात वर्षे बालकाचा समावेश आहे. मांजामुळे दुर्घटनाची मालिका सुरूच असून उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी दहा ते बारा जखमी झाल्याची वृत्त आहे.

नाशिक येथे सोनू किसन धोत्रे वय (22) राहणार चारणवाडी देवळाली कॅम्प मंगळवारी दुपारी दुचाकीने पाथर्डी गाव ते देवळाली कॅम्प रस्त्याने जात होता पाथर्डी गावातील सर्कल ओलांडून पुढे गेल्यावर पतंगाचा मांजाने त्यांच्या मानेत अडकल्याने त्यांचा गळा चिरला गेला मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागल्याने जवळच्या नागरिकांनी त्याला तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तात्काळ घटनास्थळी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पवन परदेशी यांनी धाव घेत सोनू यास शासकीय रुग्णालयात हलवले उपचार सुरू असताना सोनू धोत्रे याचा मृत्यू झाला. सोनू गुजरात मध्ये वापी येथे मामाकडे वास्तव्यास राहून वाहन चालक म्हणून नोकरी करीत होता मकर संक्रांतीच्या सणासाठी तो देवळाली कॅम्प येथे घरी येत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली आहे.

चार महिन्यांवर लग्न त्याआधी आले विघ्न

सोनू धोत्रे याचा गेल्या महिन्यात साखरपुडा झाला होता मे महिन्यात त्याच्या लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला होता मात्र सणासाठी भावाच्या घरी आलेल्या मांजाने घात केला आणि संसाराचा डाव सुरू होणे आधीच मोडला.

दुसऱ्या घटनेत जिल्ह्यातही नायलॉन मांजाने  चिमुकल्याचा दुर्दैवी बळी घेतला आहे कार्तिक एकनाथ गोरणे वैसा राहणार माळीवाडा मंगळवारी शहरातील कमला नेहरूनगर येथील त्यांच्या आजोबाकडे जेवणासाठी गेला होता जेवण आटपून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपल्या आजोबा समवेत मोटरसायकलवर पुढे बसून कार्तिक घराकडे येत होता यावेळी मानेत नायलॉन मांजा अडकल्याने त्यांचा गळात शिरला गेला त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी तपासून त्याच मृत घोषित केले.


छत्रपती संभाजी नगर मध्ये फौजदाराचा गळा कापला

छत्रपती संभाजी नगर: दुसाकीने ड्युटीवर निघालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा गळा नायलॉन मांजामुळे चिरला तर पतंग खेळत असताना मांजामुळे विद्युत प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने लहान मुलगा तब्बल 75 टक्के भाजला या दोन्ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता बीड बायपास आणि दुपारी साडेबारा वाजता पुंडलिक नगरात घडल्या. दीपक पारधी अशी जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे तसेच शंकर रंधवे वय (१२) राहणार जय भवानीनगर पारिजात नगर अशी भाजलेल्या मुलाचे नाव आह़े.  दीपक पारदे हे ग्रामीण पोलीस दलास स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.



Post a Comment

0 Comments