अखेर वन विभागाकडून वाघास पकडण्याचे आदेश, वाघाच्या दहशतीला विराम मिळणार! वनपरिक्षेत्रात पाहणी चंद्रपुरातील ताडोबाचे पथक दाखल
धाराशिव: गेल्या महिनाभरापासून धाराशिव तालुक्यातील येडशी सह शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात विस्तारलेल्या रामलिंग अभयारण्यास स्थिरावलेल्या वाघाला पकडण्याचे आदेश अखेर वन विभागाच्या प्रधान सचिवांनी दिली आहेत. त्यामुळे या भागात धुमाकूळ घालत फिरणाऱ्या वाघाच्या दहशतीला वीराम मिळणार असून या वाघाला पकडण्यासाठी दहा लोकांची टीम सोमवारपासून कामाला लागली आहे या वाघाने आजपर्यंत अनेक जनावरांवर हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. वाघाला पकडण्यासाठी सुरुवातीला त्याची लोकेशन ट्रॅक करणे गरजेचे आहे यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून यावर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.
राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव यांनी शुक्रवारी दिलेले आदेशानुसार या वाघाला पकडून त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे त्यामुळे या वाघाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवीन घर मिळणार असल्याचे दिसते या वाघाला पकडून त्याच्या शरीरावर रेडिओ कॉलर लावण्यात येईल जेणेकरून त्याच्या हालचालीचे निरीक्षण करता येणार आहे. यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यातून टी-ट्वेंटी असा सांकेतिक क्रमांक असलेल्या वाघिणीचा हा 2022 मध्ये जन्मलेला बछडा असल्याचे वन विभागाने अगोदर स्पष्ट केले आहे.
या वाघाने टिपेश्वर येथून प्रवास करत धाराशिव सोलापूर जिल्ह्याच्या सीमावरती भागात आपली बस्थान बसवले होते. यात प्रामुख्याने येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्य आणि बार्शी तालुक्यात प्रामुख्याने वाघाची हालचाल दिसून आली आहे. या वाघाने आतापर्यंत अनेक जनावरांची शिकार केली असून एका व्यक्तीला जखमी देखील केली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या संदर्भात या भागातील लोकप्रतिनिधींनी सभागृहात हे आवाज उठवला होता या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने कारवाई करत वाघाला पकडण्याचे आदेश काढले आहेत.
ताडोबाच्या वन्य जीव बचाव पथकाला वाघाला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे यात दहा लोकांचा समावेश असणार आहे ही टीम या वाघाला सापळा लावून पकडणार की डार्ट गनचा बेशुचे इंजेक्शन वापर करणारे प्रत्यक्षात मोहिमेत स्पष्ट होणार आहे मात्र या पकडलेल्या वाघाला रेडिओ कॉलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहे हे नक्की या प्रकल्पाची जबाबदारी अप्पर प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव पश्चिम विभाग डॉ. ब्लेम क्लेमेंट यांना देण्यात आली असल्याची समजते वन विभागाने यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून वाघाच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.
तीन आठवड्यात १६ जनावरांवर हल्ला
मागील तीन आठवड्यापासून वाघ हा धाराशिव व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील भागात आहे या तीन आठवड्यात वाघाने दोन्ही जिल्ह्यातील १६ जनावरांवर हल्ला केला आहे तसेच हे नैसर्गिक अधिवास नसल्याने मुख्य वनरक्ष संरक्षण वाघाला पकडण्याचे आदेश दिले आहे.
ताडोबा येथील तज्ञाची पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक होणार आहे त्यांच्याशी चर्चा झाल्यास ते आदेश देतील त्याप्रमाणे कारवाईस सुरुवात होईल
कुशाग्र पाठक वन संरक्षक वन विभाग सोलापूर.
0 Comments