Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथे घरफोडी

तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथे घरफोडी ,सोन्याच्या दागिनेसह रोकड लंपास


धाराशिव: घरफोडी करून चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली ही घटना तुळजापूर तालुक्यातील बोळेगाव येथे घडली या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे चोरी लुटालुतीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांना चोरट्यांना जर बंद करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की बोळेगाव येथील अभिमन्यू दादाराव काळे यांचे मोठे भाऊ महादेव वहिनी प्रयागबाई हे दोघे देवदर्शनसाठी ओडिसा येथील जगन्नाथ मंदिराकडे गेले होते दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले 17 ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने किंमत 68 हजार रुपये घेऊन चोरट्याने पलायन केली ही घटना बुधवार दिनांक 8 रोजी रात्री घडली गुरुवारी सकाळी ही चोरीची घटना निदर्शनात आली याप्रकरणी काळे यांनी बुधवारी दिनांक 15 रोजी नळदृग पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली त्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments