चिवरी येथे आमदार राम कदम यांचा सत्कार
चिवरी :तुळजापुर तालुक्यातील चिवरी येथे मुंबई घाटकोपरचे आमदार राम कदम यांची सलग चौथे वेळेस आमदारपदी निवड झाल्याबद्दल चिवरी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी लहुजी शक्ती सेना चिवरी यांच्या वतीने आमदार राम कदम यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला .यावेळी पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक पाटील युवा ,नेते बालाजी पाटील लहुजी शक्ती सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब देडे, युवा लहुजी शक्ती सेना तालुका कोर कमिटी अध्यक्ष दशरथ देडे, अनिल जाधव, भिमा देडे ,मारुती गायकवाड ,महिला तालुकाध्यक्ष बबिता गायकवाड, सुरज देडे , विशाल देडे , समर्थ लोंढे, सुमित शिंदे आदींसह लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments