जय मल्हार पत्रकार संघाचा मकर संक्रांत दिनी, दिनदर्शिका व सन्मान सोहळा आयोजित
अणदूर प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या जय मल्हार पत्रकार संघाचा मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व अणदूर येथील दीपस्तंभाचा कृतज्ञता सन्मान सोहळा आयोजीत केला असून या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक श्रीकांत अणदूरकर यांनी केले आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून जय मल्हार पत्रकार संघ विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. नारी सक्तीचा सन्मान, नवरत्नांचा सन्मान, हलगी महोत्सव, कोरोना काळात जनजागृती अभियान अशा विविध उपक्रम राबवून जिल्ह्यात अग्रेसर ठरलेल्या या पत्रकार संघाचा विविध स्तरातून कौतुक केले जाते.
१४जानेवारी रोजी सकाळी साडेबारा वाजता हुतात्मा स्मारक येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व अणदूर मधील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून 90 वर्षे पूर्ण करणाऱ्या दीपस्तंबाचा सन्मान सोहळा आयोजीला असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निळकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामी तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे शहध्यक्ष सद्गुरु ह भ प गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते सोहळ्याच्या आयोजन केले आहे.
या विषय सोहळ्यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, बाबुराव कुलकर्णी गुरुजी, नीलकंठ नरे गुरुजी, बाबुराव घोडके गुरुजी यांचा सन्मान केला जाणार असून या कार्यक्रमास तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील मालक चव्हाण, सरपंच रामचंद्र आलूरे, डॉ. जितेंद्र कानडे, डॉ. नागनाथ कुंभार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
0 Comments