Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन


सोलापुर : सोलापूर जिल्ह्याचे माजी महापौर महेश  अण्णा कोठे यांचे निधन झाल्याने सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत,मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते, त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. दवाखान्यामध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आले यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली.

सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवले महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते. महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापूरचे सर्वात तरुण महापौर


दरम्यान, सोलापूरचे माजी महापौर महेश अण्णा कोठे यांचं वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आहे. महेश कोठे यांनी यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. महेश कोठे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे योगदान होते. सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पाडल्या होत्या. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोठे यांच्या राजकारणात  प्रवास राहिला आहे.

Post a Comment

0 Comments