Hot Posts

6/recent/ticker-posts

सीईटीचा अर्ज भरतानाच कागदपत्रांची माहिती प्रवेशातील अडथळे कमी करण्यासाठी उपाय योजना

सीईटीचा अर्ज भरतानाच कागदपत्रांची माहिती प्रवेशातील अडथळे कमी करण्यासाठी उपाय योजना


मुंबई: सीईटी नंतर ज्यावेळी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशाची वेळ येते त्यावेळी प्रवेश या संदर्भात विद्यार्थ्यांना अडचणी येऊन येत म्हणून आता प्रवेश पूर्व परीक्षांच्या नोंदणी वेळीच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील तसेच त्याचा नमुना कसा असेल याची माहिती सीईटी सेलकडून प्रवेश परीक्षेचे अर्ज भरताना संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात आहेत.

त्यासाठी सीईटी सेलच्या स्थळावर नवे बदल करण्यात आले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्राचा फॉर्मुला दिला जाणार आहे सिटी सेल मार्फत दरवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते मात्र अनेकदा प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची विद्यार्थ्यांना माहिती नसते तसेच विद्यार्थी जातीचे प्रमाणपत्र काढतात मात्र जात वैधता किंवा नॉन क्रिमिनल चे प्रमाणपत्र लागते यांची माहिती त्यांना नसते त्यातून एक ऐनवेळी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना कमी कालावधीत कागदपत्रे मिळावी लागतात. कागदपत्रे मिळाले नाही तर अनेकांना त्यांच्यावर खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेण्याची वेळ येते तसेच सीईटी सेलही विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागते.अशा परिस्थितीत काही विद्यार्थ्यांना शासकीय नुकस्कान देखील सहन करावी लागते त्यांची काळजी घेऊन सिटी सेल कडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

संकेतस्थळावर प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणार रकाना असणार आहे. त्यात आवश्यक प्रमाणपत्राची माहिती दिसणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची कागदपत्रे जमा करण्यासाठी होणारी धावपळ कमी होईल विद्यार्थ्यांकडे प्रवेशावेळी एखादे कागदपत्र नसते त्यामुळे ऐनवेळी विद्यार्थ्यांची गैरसोयी होते. या गोष्टी लक्षात घेता त्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरतानाच प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी संकेतस्थळावर बदल केले आहेत. यामुळे विद्यार्थी आतापासूनच कागदपत्रे मिळवण्याची तयारी करतील त्यातून प्रवेश प्रक्रिये वेळी त्यांच्यावर ताण येणार नाही शिवाय प्रवेश प्रक्रिया ही सुरळीत पार पडेल असेही सीईटीकडुन सांगण्यात आले आहे.


नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यावर विद्यार्थ्यांसमोर आवश्यक कागदपत्रांचा रखाना येणार आहे यामध्ये प्रवर्गनिहाय आवश्यक कागदपत्रे तसेच या प्रमाणपत्रासाठी करावे लागणारे अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आवश्यक कागदपत्रांची माहिती व अर्ज करण्याचा नमुना हा विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यायची सुविधाही देण्यात आली आहे.

दिलीप सरदेसाई आयुक्त राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष


Post a Comment

0 Comments