अल्पवयीन मुलीची आत्महत्या एका आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी
नांदेड प्रतिनिधी: शहरातील एका अल्पवयीन मुलीला दोघांनी नाहक त्रास दिल्याने तिने आत्महत्या केली या प्रकरणात न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवले परंतु यापैकी एक जण मरण पावला तर दुसऱ्याला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि या ठाण्यापासून जवळच असलेल्या पोर्णिमा नगरात व्यंकट गोपाळे यांच्या घरी एक कुटुंब किरायाने राहत होते या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीचा घरमालक व्यंकट गोपाळे यांनी विनय भंग केला होता. त्यामुळे सदर कुटुंबीय घर सोडून दुसरीकडे राहायला गेले त्यानंतर पिढी तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात व्यंकटराव गोपाळेविरुद्ध तक्रार दिली होती.त्यामुळे वेंकटराव गोपाळ विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिढीतही शहरातील दुसऱ्या भागात राहिल्यास गेली होती तिथून ती महाविद्यालयात जाताना येताना आरोपी व्यंकट व त्याचा मुलगा चंद्रमुनी ही दोघेही तिला अडवून धमकावत होते. गुन्हा मागे घे अन्यथा तुझे काहीही करतो असे धमकावत होते. त्यामुळे ती तणावात होती. तुझी कॉलेजची शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण गावाकडे जाऊ असे तिला कुटुंबीयांनी त् सांगितले परंतु पिढीचा एके दिवशी फोन करण्याच्या बहाण्याने घराच्या गच्चीवर गेली आणि वरून उडी मारली. रक्तबंबाळ झालेल्या पिढीतेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर मताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी व्यंकटराव गोपाळे व मुलगा चंद्रमणी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 306 व 34 अन्वये जुना दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोघाविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केली होती परंतु या खटल्या दरम्यान व्यंकट गोपाळे यांचा मृत्यू झाला सदर प्रकरणात सरकार पक्षाची साक्षर तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे व दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश शशिकांत बांगर यांनी मयत व्यंकट चा मुलगा चंद्रमणी याला दोषी ठरवत दहा वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील रणजीत देशमुख यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सपोनी आर्टिडोले यांनी काम पाहिले.
0 Comments